सोलार बद्दल

रूफ टॉप सोलर बसविल्या पासून, मुद्दलाच्या निदान १५% बचत दरवर्षी होणार म्हणजे ५/६ वर्षात गुंतवणुकीची परतफेड होणार, व पुदील १५/२० वर्ष नगण्य खर्च राहणार. हे खास करून व्यापारी व औद्योगिक दराने बीले भरणाऱ्या करिता.

नियमित वीजपुरवठा असेल तिथे, पुरवठ्या सोबत सोलर जोडल्यास (ग्रीड टाय) प्रथम सोलर वीज वापरली जाते व कमी पडल्यास पुरवठ्याच्या लाईनीतून घेतली जाते. ही सर्वात कमी खर्चाची पद्धत आहे.

“पुरवठया सोबत जोडलेले सोलर – बॅटरी शिवाय”

InfoGraphics1

ज्याठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असतो तेथे हायब्रीड पद्धतीची सोलर सिस्टिम बसविणे योग्य असते. या मध्ये बॅटरीचा वापर होतो व वीज खंडित झाल्यास हायब्रीड इन्व्हर्टर बॅटरीच्या शक्तीवर पुरवठा चालू ठेवतो.
“ऑफ ग्रीड सोलार – बॅटरी बॅकअप”
 

InfoGraphics2