२०१० पासून आम्ही लहान व मोठया हायब्रीड सोलार सिस्टिम नी सुरवात केली व पुढे गिर्हाइकांना अधिक फायदेशीर होणारी पुरवठया सोबत जोडलेल्या (बॅटरीशिवाय ग्रीड टाय) सोलर सिस्टिम्स जास्त केल्या आहेत.

आम्ही संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी घेतो म्हणजे गिर्हाईकास एकहाती व्यवहार करणे सोयीचे होते. तसेच आम्ही फक्त वीज पुरवठ्याचा करार करू शकतो. प्रकल्प उभारणी नंतर दैनंदिन चालविणे व देखभालीची व्यवस्था करू शकतो .
संपूर्ण भारतात आम्ही असे प्रकल्प करू शकत असलो तरी तूर्त महाराष्ट्रावर भर देत आहोत कारण इथल्या विजेचा दर महाग असल्यामुळे असे प्रकल्प गिर्हाइकांना अधिक फायदेशीर ठरतात.
अनुभव
आम्ही आतापर्यंत संपूर्ण देशात २५० हुन अधिक रुफटॉप प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राजस्थान ते केरळ व गुजरात ते झारखंड, १ KWP हायब्रीड खेडेगावपासून १०० KWP पुरवठया सोबत जोडलेले, शहर भागात, असा आमचा अनुभव आहे.
आम्ही बांधकामासाठी व इलेक्ट्रिक कामासाठी जाणकार, अनुभवी आणि किफायतशीर कंन्त्राटदारांशी जुपी केली आहे म्हणून गिर्हाईकांना समाधानकारक सेवा मिळते.